VIDEO : Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात उच्चशिक्षित मंत्री ?
नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि देबाश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशकं यांनी प्रकृतीच्या कारणामुळं राजीनामा दिला असल्याचं कळतं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात उच्चशिक्षित मंत्र्यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.