‘आधी स्वतः चं नावं शिवाजी आणि मुलांची संभाजी भुजबळ करा’, छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ टीकेवर कुणाचा पलटवार?
VIDEO | 'आधी स्वतः चे नावं शिवाजी भुजबळ करा आणि आपल्या मुलांची संभाजी भुजबळ करा, हिंदू धर्मामधील कुठल्याही जातीला बदनाम करण्याचं छगन भुजबळ यांचं धोरण आणि उद्देश', छगन भुजबळ यांच्यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांचा हल्लाबोल
पुणे, १९ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं.’, असे छगन भुजबळ म्हणाले. तर ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असेही पुढे छगन भुजबळ म्हणाले. यालाच हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले आहे. आधी स्वतः चे नावं शिवाजी भुजबळ करा आणि आपल्या मुलांची संभाजी भुजबळ करा, त्याला कायद्याने मान्यता आहे, असे म्हणत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी आक्रमक होत ते म्हणाले, हिंदू धर्मामधील कुठल्याही जातीला बदनाम करण्याचं धोरण आणि उद्देश नेहमीच छगन भुजबळ यांचा असतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.