Eknath Shinde गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा अडचणीत, काय आहे प्रकरण? पाहा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा अडचणीत? तलवारबाजी करणं आलं अंगलट
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | कळमनुरी येथील एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना तलवारबाजी करणं चांगलंच भोवलं आहे. कावड यात्रेत तलवार नाचवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सार्वजनिक ठिकाणी तलवार नाचवणं संतोष बांगर यांच्या आंगाशी आलंय. आर्म अॅक्टनुसार, संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी येथील कॉन्स्टेबल सतीश शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. कावड यात्रेत सहभागी झाल्यानंतर संतोष बांगर यांनी आधी भाषण केलं. नंतर मोठ्या थाटात फेटा बांधला नंतर स्वतःचे दंड थोपटून विरोधकांना इशाराही दिला. मात्र हा धार्मिक कार्यक्रम होता की राजकीय सभा असा प्रश्नही अनेकांना पडलाय. बघा स्पेशल रिपोर्ट कावड यात्रेत नेमकं काय काय घडलं…?
Published on: Aug 30, 2023 12:09 AM