हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी काढले स्वतःचे अवयव विक्रीला, हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी विजय वडेट्टीवार यांनी मोठी मागणी
शेतकऱ्यांनी किडनी विकण्याची आणि त्यांचं वावर विकण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार आहे. त्यामुळे सरकारने या राज्यात शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
हिंगोली, २३ नोव्हेंबर २०२३ : राज्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घ्यायला या सरकारला वेळच नाही. सत्तेचा मलिदा खाण्यात हे सरकार व्यस्त असल्याचे म्हणत राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. तर राज्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही त्यांनी केली. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी हातबल झाला आहे. मराठवाड्यात धरणात पाण्याचा साठा केवळ 36 टक्के शिल्लक आहे. आजू सात महिने काढायचे आहे. पिण्याचे पाणी नाही. शेती पिकं येत नाही. या स्थितीत शेतकऱ्यांनी किडनी विकण्याची आणि त्यांचं वावर विकण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार आहे. त्यामुळे सरकारने या राज्यात शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
Published on: Nov 23, 2023 02:07 PM