‘यांच्या हातून मरण्यापेक्षा मी…’, धमकीच्या फोन नंतर आमदाराचे अश्रू अनावर

| Updated on: Apr 22, 2023 | 11:49 AM

VIDEO | अन् ढसाढसा रडत आमदारानं सांगितलं धमकी कशी आणि का कुणी दिली? बघा व्हिडीओ

नाशिक : राज्यात राजकीय क्षेत्रातील मंडळींना धमकी देण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. त्यानंतर अनेक नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान, आता नाशिकमधील कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरामण खोसकर हे इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या राज्यातील बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया सुरू असताना ही धमकी देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दोन कोटी खर्च करून तुला निवडणुकीत पाडेल अशी धमकी देत तुला बघतो अशी धमकी दिल्याचे आमदार खोसकर यांनी म्हटलं असून या धमकीबाबत बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. हिरामण खोसकर म्हणाले, आम्हाला महाविकास आघाडीचे काम करण्याचे वरुण आदेश आले आहे. मी आमदार असल्याने मला काम करावे लागणार आहे. शिवाजी चुंबळे आणि त्यांचा मुलगा अजिंक्य चुंबळे यांनी मला 10 वेळेस फोन केले आहे. मला धमक्या दिल्या. देविदास पिंगळे यांचे काम करू नको,असे धमकावले.

Published on: Apr 22, 2023 11:49 AM
आमदाराला शिवीगाळ अन् धमकीचा कॉल, काय आहे धमकीचं कारण? कुणाला आला फोन
‘तर अनेक जणांचा कार्यक्रम झाला असता’, नाव न घेता धनंजय मुंडे यांनी कुणाचा घेतला समाचार