Durgadi Fort : कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कल्याण कोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय
ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे १९७१ साली दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद यावरुन सुनावणी झाली होती. दरम्यान, आज कल्याण कोर्टाकडून ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे तर मशीद नाही, असे कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले आहेत. ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद आहे, यासंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती. यासंदर्भातील सुनावणीनंतर कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून यासंदर्भात सुनावणी सुरू होती अखेर आज याप्रकरणी कल्याण कोर्टाकडून हा निकाल देण्यात आला आहे. यासंदर्भात शिवप्रेमींकडून या किल्ल्याच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान, दुर्गाडी किल्ल्यावर मशीद असल्याचा दावा एका मुस्लिम संघटनेने केला होता. मात्र हा दावा कोर्टानं खोडून काढला आणि कोर्टानं कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे १९७१ साली दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद यावरुन सुनावणी झाली होती. दरम्यान, आज कल्याण कोर्टाकडून ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोर्टाकडून देण्यात आलेल्या या निकालानंतर हिंदू संघटना, शिवप्रेमींकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आरती करण्यात आली आणि मोठा जल्लोष देखील कऱण्यात आला.