Special Report | एमईआयएलनं रचला इतिहास, काश्मीर लडाखशी जोडलं जाणार
मेगा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) टीमने जम्मू-काश्मीर-लडाख प्रदेशात ऑल वेदर रोड (All Weather Road) असलेल्या झोजिला बोगद्याच्या बांधकामात यश मिळवले.
मुंबई : मेगा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) टीमने जम्मू-काश्मीर-लडाख प्रदेशात ऑल वेदर रोड (All Weather Road) असलेल्या झोजिला बोगद्याच्या बांधकामात यश मिळवले. जम्मू आणि काश्मीर ते लेह लडाख या सर्व हवामान मार्गासाठी (All Weather Road) बांधण्यात येत असलेल्या झेड मोड बोगद्याच्या ट्यूब 2 च्या खोदकामाचे काम सोमवारी पूर्ण झाले. त्याचे काम ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झाले होते. प्रकल्पाची एकूण लांबी 32 किमी असून, ती दोन भागात विभागली गेलीय. हे बोगदे मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) द्वारे बांधले जात आहेत. सर्व हवामान रस्ते 2024 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.