नाव घ्यायचं नाही, पण तिच्याविरोधात 17-18 गुन्हे दाखल आहेत- दिलीप वळसे पाटील
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिचं समर्थन केलं होतं. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिचं समर्थन केलं होतं. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “सदाभाऊंनी आधी समर्थन केलं. नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. मूळातच विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये. या महिलेवर 17-18 प्रकारचे गुन्हे आहेत. त्यामुळे तिची मानसिकता अशीच दिसते. असाच प्रकारचं कृत्य करण्याचं यातून दिसून येतं. अशी वृत्ती चुकीची आहे. त्यामुळे खोत यांनी भूमिका बदलली असले”, असं ते म्हणाले.