कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह, ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा !

| Updated on: Mar 18, 2022 | 10:32 AM

कोकणात शिमगोत्सवाचा थाट काही वेगळा...प्रथेनुसार पोर्णिमेला ग्रामदैवतेची सुरमाडाची होळी उभी करण्याची प्रथा आहे. या शिमगोत्सवात कोकणात विविध प्रथा आणि परंपरा पहायला मिळतात.

कोकणात शिमगोत्सवाचा थाट काही वेगळा…प्रथेनुसार पोर्णिमेला ग्रामदैवतेची सुरमाडाची होळी उभी करण्याची प्रथा आहे. या शिमगोत्सवात कोकणात विविध प्रथा आणि परंपरा पहायला मिळतात. कोकणातल्या ग्रामिण भागात आजही सुरमाडाची होळी उभी करण्याची पंरपरा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवते. रत्नागिरी जवळच्या भोके गावात सुरमाडाची 60 फुटांहून अधिक उंच होळी उभी केली जाते. काही शे किलो वजनाची, हि होळी उभी करण्याचा थरार अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.

सध्या ढोल ताशांच्या गजरांनी कोकण दुमदुमुन गेलय. अनेक ठिकाणी सध्या ग्रामदैवतेच्या सजलेल्या पालख्या दिसू लागल्यात. कोकणात तेरसा म्हणजे त्रयोदशीला आणि काही ठिकाणी पोर्णिमेला ग्रामदैवतेच्या होळ्या उभ्या करण्याची पद्धत आहे. भोके गावातील. इथल्या ग्रामदैवतेच्या होळी उभी करण्यासाठी लगबग सुरु आहे. होळी उभी कऱण्यासाठी हे भाविक सज्ज आहेत. शिमग्यात कोकणात विविध परंपरा पहायाल मिळतात. त्यातील एक म्हणजे . पालखी होळी तोडण्यासाठी बाहेर पडते. त्यानंतर मानकऱ्यांनी सुरमाड निश्चित केलेल्या ठिकाणी पालखी पोहचते. आणि तोडलेली होळी घेवून जाण्याचा सोहळा रंगतो.

सुरमाडाची शेकडो टन वजनाची होळी आणण्याची पद्धत अंगावर काटा आणते. पण त्याहून हि होळी उभी करताना तर अंगावर काटा येतो. केवळ दोरी आणि लाकडांच्या कैचीनी हि होळी उभी केली जाते. या होळीचा डोलारा सांभाळत दोरीच्या सहाय्याने काही मिनिटात हि होळी उभी रहाते. कोणालाही कुठली दुखापत न होता भाविक आपल्या जोशावर हि होळी लिलया उभी करतात.

मेळघाटात होळी निमित्ताने MP Navneet Rana यांनी धरला आदिवासी नृत्यांवर ठेका
वृंदावनमध्ये होळीचा उत्साह शिगेला