Holi Festival | ढोल- ताशांच्या गजरात पालखी भेटीचा सोहळा, मिऱ्या येथे पारंपरिक पद्धतीने शिमगा साजरा
कोकणात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा करण्यात आला. रत्नागिरीतील मिऱ्या येथे पारंपरिक शिमगा साजरा करण्यात आला. ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी कोकणातील लोकांना याठिकाणी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात पालखी भेटाचा सोहळा पहायला मिळाला.
रत्नागिरी : राज्यात ठिकठिकाणी होळीचा (Holi) सण साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी पारंपरिक (Traditional) पद्धतीनं होळीनिमित्त नृत्य करण्यात आलं. तर अनेक ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकणाताही (Kokan) मोठ्या उत्साहात होळी सण साजरा करण्यात आला. रत्नागिरीतील (Ratnagiri) मिऱ्या येथे पारंपरिक शिमगा साजरा करण्यात आला. ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी कोकणातील लोकांना याठिकाणी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात पालखी भेटाचा सोहळा पहायला मिळाला.
Published on: Mar 18, 2022 12:33 PM