Amit Shah in Mumbai : अमित शाह आज मुंबईत! राज ठाकरे-शाह भेट होणार की गृहमंत्री फक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेणार?
याच दौऱ्यादरम्यान, ते लालबागचा राजा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळातील बाप्पासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेतील. आज रात्री अमित शाह मुंबईथ दाखल होणार आहेत.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबईत दाखल होणार आहे. दरवर्षी अमित शाह मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. सालाबादप्रमाणे यंदाही ते मुंबईत लालबागच्या राजाचं (Lalbaucha Raja) दर्शन घेतील. दरम्यान, आजच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीचीही चर्चा रंगली आहे. आज मुंबईत अमित शाह आणि राज ठाकरे (Amit Shah Raj Thackeray Meet News) यांची भेट होणार असल्याची कुजबूज सुरु होती. मात्र ही शक्यता फार नसल्याचं सांगितलं जातंय. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. अमित शाह हे मुंबईतील वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही मुंबई दौऱ्यादरम्यान हजेरी लावणार आहे. याच दौऱ्यादरम्यान, ते लालबागचा राजा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळातील बाप्पासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेतील. आज रात्री अमित शाह मुंबईथ दाखल होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने फडणवीस, शेलार यांच्यासोबत शाह यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
असा असेल दौरा :
- आज रात्री 9.30 वाजता अमित शाह मुंबईत दाखल होणार
- उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
- नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मग आशिष शेलार यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेणार
- शेवटी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची शक्यता