राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार की नाही? दिलीप वळसे पाटील म्हणतात..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार की नाही? असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार की नाही? असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचं कारण नाही. पोलीस आयुक्त परवानगी देतील. घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांनी सभा घ्याव्यात, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. औरंगाबाद येथील औरंगजेबाची कबर खोदून काढा असा इशारा मनसेने दिला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. याबाबत कारवाई करण्यास औरंगाबादचे पोलीस सक्षम आहेत. ते योग्य ती कारवाई करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.