बिर्याणीची ऑडिओ क्लिप ऐकली, विषय गंभीर, चौकशीचे आदेश | Dilip Walse Patil

| Updated on: Jul 30, 2021 | 5:57 PM

एसपी हॉटेलची बिर्याणी फुकट खाण्याचा अट्टाहास पुण्यातील महिला डीसीपीच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. “ती ऑडिओ क्लिप मीसुद्धा ऐकली, हा खूप गंभीर प्रकार आहे” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

एसपी हॉटेलची बिर्याणी फुकट खाण्याचा अट्टाहास पुण्यातील महिला डीसीपीच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. “ती ऑडिओ क्लिप मीसुद्धा ऐकली, हा खूप गंभीर प्रकार आहे” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना याबाबतची पूर्ण चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त महिलेने पोलीस कर्मचाऱ्याकडे केलेल्या या फर्माईशीची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. TV9 मराठीने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय.

Breaking | सखल भागातील रस्त्यांची उंची वाढवण्याचा विचार, सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार
‘पूरग्रस्त भागात वीजबिल वसूल करू नका’ , उर्जामंत्री Nitin Raut यांचे आदेश