Special Report | सन्मान की मतदान? 1 ऑगस्ट रोजी शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार?

| Updated on: Jul 30, 2023 | 8:19 AM

VIDEO | राज्यसभेत केंद्राच्या अध्यादेशाविरोधात मतदान झालं तर मग सन्मान की मतदान? शरद पवार यांच्यासमोर मोठा पेच, कोणती भूमिका घेणार?

मुंबई, 30 जुलै 2023 | १ ऑगस्ट रोजी जर राज्यसभेत केंद्राच्या अध्यादेशाविरोधात मतदान झालं तर मग सन्मान की मतदान असा पेच शरद पवार यांच्या समोर उभा राहणार आहे. ऑगस्टला शरद पवार प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र त्याच दिवशी राज्यसभेत मतदानाची वेळ आली तर शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे विरोधकांचं लक्ष लागून आहे. कारण १ ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान यांना एक पुरस्कार देण्यात येणार आहे. तर ३१ जुलै किंवा १ ऑगस्ट रोजी राज्यसभेत दिल्ली सरकारच्या बदली संदर्भातील केंद्राच्या अध्यादेश विरोधात विरोधक मतदान करणार आहेत. एकीकडे पवार विरोधकांच्या बैठकांना उपस्थित राहताय, त्याचाच पक्ष फुटून भाजपसोबत गेला असला तरी पवारांचा गट भाजपविरोधी भूमिका घेण्यास ठाम आहे. मात्र जर १ ऑगस्टला पेच निर्माण झाला तर शरद पवार कोणता मार्ग निवडणार, यावरून तर्क वितर्क सुरू झालेत.

Published on: Jul 30, 2023 08:19 AM
Special Report : “एक एक फोडण्यापेक्षा, डायरेक्ट…”, उद्धव ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना आव्हान!
‘… मग हे इंडियावाले काय करणार’, पंतप्रधान मोदी यांच्या ‘इंडिया’वरील टीकेवर संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर