Special Report | विनायक मेटेंच्या, कारचा अपघात कसा झाला ? अपघातच आहे की घातपात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

| Updated on: Aug 22, 2022 | 10:52 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) अपघाताची माहिती दिलीय. पुण्याहून मुंबईकडे येत असताना एक्सप्रेस वे वरुन एक ट्रॉलर शेवटच्या लेनमधून चालत होता. नंतर हा टॉलरमधल्या लेनमध्ये आला, त्यामुळं मेटेंच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यानंतर मेटेंच्या ड्रायव्हरनं कार तिसऱ्या लेनमध्ये टाकून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र टॉलर आणि समोरची गाडीमध्ये असलेल्या अगदी छोट्या जागेतून मेटेंच्या ड्रायव्हरनं ओव्हरटेकचा प्रयत्न केला. त्याचवेळी ट्रॉलरची धडक मेटेंच्या कारला बसली आणि जोरदार अपघात झाला.

मुंबई : विनायक मेटेंच्या(Vinayak Mete), कारचा अपघात कसा झाला ? अपघातच आहे की घातपात? यावरुन सवाल उपस्थित होत असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) अपघाताची माहिती दिलीय. पुण्याहून मुंबईकडे येत असताना एक्सप्रेस वे वरुन एक ट्रॉलर शेवटच्या लेनमधून चालत होता. नंतर हा टॉलरमधल्या लेनमध्ये आला, त्यामुळं मेटेंच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यानंतर मेटेंच्या ड्रायव्हरनं कार तिसऱ्या लेनमध्ये टाकून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र टॉलर आणि समोरची गाडीमध्ये असलेल्या अगदी छोट्या जागेतून मेटेंच्या ड्रायव्हरनं ओव्हरटेकचा प्रयत्न केला. त्याचवेळी ट्रॉलरची धडक मेटेंच्या कारला बसली आणि जोरदार अपघात झाला.

शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि स्वत: मेटेंच्या पत्नी डॉ. ज्योती मेटेंनी अपघातावरुन शंका उपस्थित केलीय. ड्रायव्हर एकनाथ कदम, नेमकं लोकेशन देत नव्हता, असा आरोपही ज्योती मेटेंनी केला. त्यामुळं यापुढं अपघातानंतर 112 नंबरवर कॉल केला तर थेट लोकेशन कसं मिळेल, अशी यंत्रणा उभारणार असल्याचं फडणवीस म्हणालेत. तर मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरील ट्रॅफिक आणि आता मेटेंच्या कारच्या अपघातानंतर, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एक्स्प्रेस वे 6 ऐवजी 8 लेनचा करण्याची मागणी केलीय. अपघात कसा झाला, याची माहिती फडणवीसांनी विधानसभेत दिली. पण त्याचवेळी मेटेंचा ड्रायव्हरही जबाब बदलतोय. त्यामुळं पुढच्या तपासात काय पुढे येतं ? हेही दिसेलच

Published on: Aug 22, 2022 10:52 PM
Ajit Pawar : अजित पवारांची सभागृहात फडणवीसांवर टोलेबाजी, सत्तांतराचाही सांगितला किस्सा..!
Special Report: शिवसेना कुणी फोडली, अजित पवारांनी भाजप नेत्याचे नाव घेऊन सांगीतले