‘चंद्रयान ३’ मोहीम नेमकी कशी असणार? जाणून घ्या खगोलतज्ज्ञ केतकी जोगदे यांच्याकडून…

‘चंद्रयान ३’ मोहीम नेमकी कशी असणार? जाणून घ्या खगोलतज्ज्ञ केतकी जोगदे यांच्याकडून…

| Updated on: Aug 23, 2023 | 4:46 PM

VIDEO | संपूर्ण देशाचे लक्ष चंद्रयान तीन मोहिमेकडे लागलं आहे. सायंकाळी सहा वाजून काही मिनिटांनी इस्त्रोने पाठवलेलं यान चंद्रावर उतरणार, चंद्रयान ३ मोहिमेची माहिती जाणून घ्या खगोलतज्ज्ञ केतकी जोगदे यांच्याकडून...नेमकी कशी असणार मोहीम?

अहमदनगर, २३ ऑगस्ट २०२३ | भारताची चांद्रयान-3 मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वकाही सुरळीत राहिलं, तर 23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 मिनिटांनी चांद्रयान-3 लँड करेल. सर्वकाही ठरल्यानुसार चालू आहे, अशी इस्रोने मंगळवारी टि्वट करुन माहिती दिली. संपूर्ण देशाचे लक्ष चंद्रयान तीन मोहिमेकडे लागलं आहे. सायंकाळी सहा वाजून काही मिनिटांनी इस्त्रो ने पाठवलेलं यान चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर यान पाठवून संशोधन करणाऱ्या संस्थांनी आतापर्यंत उत्तर ध्रुवावर संशोधन केलं आहे. मात्र इस्रो कडून आव्हानात्मक अशा दक्षिण ध्रुवावर संशोधन करण्यासाठी चांद्रयान मोहीम सुरू केलीये. या मोहिमेतील चांद्रयान एक आणि दोन यशस्वी झाल्यानंतर पुन्हा दक्षिण ध्रुवावर संशोधन करण्याचं तेच आव्हान कायम ठेवत चांद्रयान तीन मोहीम हाती घेतली असून आज त्याचा चंद्रावर यशस्वीपणे उतरण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पडत आहे. नेमकं हे यान कसं असणार आहे, त्याचं नेमकं कार्य कसं असणार आहे.. जाणून घ्या

Published on: Aug 23, 2023 04:45 PM
अखेर तोडगा निघाला? कांदा व्यापारी उद्या करणार ‘येथे’ कांदा लिलाव; तिसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद
Chandrayaan-3 landing live : ISRO रचणार इतिहास, चांद्रयान 3 काही वेळात होणार लँड