विधानसभेत जागावाटपाचा कसा असणार फॉर्म्युला? महायुतीत कोणाला किती जागा मिळणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ११३ जागांवर ९३ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ११३ जागांवर ९३ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ११३ जागा लढवण्याच्या तयारीत आहे का? असा सवाल सध्या चर्चेचा ठरतोय.
विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे. अशातच जागा वाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही म्हटले जातंय. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ११३ जागांवर ९३ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ११३ जागा लढवण्याच्या तयारीत आहे का? असा सवाल सध्या चर्चेचा ठरतोय. दरम्यान, ११३ जागा जर शिंदे गटाच्या शिवसेनेने लढल्या तर १६० ते १७० जागांवर भाजप लढण्याची शक्यता आहे. असे झाले तर अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ १५ जागा मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Published on: Jul 29, 2024 11:30 AM