Anil Parab | कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला?, जाणून घ्या
मागील तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
मागील तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केल्याची माहिती परब यांनी यावेळी दिलीय. ‘मागील 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपात कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची प्रमुख मागणी होती. याबाबत सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत होतो. आणि माननीय उच्च न्यायालयात हा विषय गेल्यावर त्यावेळी एक त्रिसदस्यीय समिती बनवली. विलिनीकरणाचा निर्यण 12 आठवड्याच्या आत समितीने घ्यावा असा आदेश देण्यात आला होता. या विलिनीकरणाचा जो विषय आहे त्याबाबतच आपलं म्हणणं समितीसमोर मांडावं. समितीने तो अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडावा आणि त्यानंतर तो उच्च न्यायालयात द्यावा असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सरकारची भूमिका ही उच्च न्यायालयाचं पालन करणारी असल्यानं समितीचा जो काही निर्णय येईल तो आम्ही मान्य करु अशी भूमिका जाहीर केली होती’, असं परब म्हणाले.