भाजपसह शिंदे अन् अजितदादांच्या गटाची रस्सीखेच, महायुतीच्या छोट्या मित्र पक्षांना किती जागा देणार?

| Updated on: Mar 08, 2024 | 12:26 PM

जागावाटपावरून भाजपसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता लहान घटक मित्रपक्षांनी देखील जागेची मागणी केली आहे. रामदास आठवले यांच्यासह सदाभाऊ खोत यांना भाजप वाटा देणार का?

मुंबई, ८ मार्च २०२४ : जागावाटपावरून भाजपसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता लहान घटक मित्रपक्षांनी देखील जागेची मागणी केली आहे. रामदास आठवले यांच्यासह सदाभाऊ खोत यांना भाजप वाटा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप आणि महायुतीचे छोटे मित्र पक्ष पाहिले तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पॉर्टी ऑफ इंडियाकडून २ जागांची मागणी केली आहे. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीमध्ये आहे. त्यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार असून त्या भाजपच्या तिकीटावर लढणार हे जवळपास निश्चित झालंय. तर सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेकडून हातकणंगले मतदारसंघाची मागणी केली. महादेव जानकरांचा पक्ष म्हणायला महायुतीमध्ये असला मात्र जानकरांचा कल हा मविआकडे असून शरद पवार माढ्याची जागा सोडू शकतात. बच्चू कडू यांनी लोकसभा लढणारच नसल्याचे म्हटल्याने त्यांना जागा सोडण्याचा प्रश्नच नाही… बघा आणखी कोणत्या लहान मित्र पक्षांनी काय केली मागणी?

Published on: Mar 08, 2024 12:26 PM
कार्यकर्त्यांना दम दिल्यास… अजितदादांच्या आमदाराला शरद पवार यांचा इशारा, नेमकं काय घडलं?
LPG Price : महिला दिनी मोदींकडून मोठं गिफ्ट! सिलेंडरच्या किंमती ‘इतक्या’ रुपयांनी कमी