ऑपरेशन कमळ: एकनाथ शिंदे यांचं बंड कसं झालं?

| Updated on: Jun 21, 2022 | 3:44 PM

सोमवारी झालेल्या मतदानानंतर शिवसेनेचे आमदार गायब व्हायला सुरुवात झाली. गायब झालेले आमदार ठाण्यात जमले. ठाण्याहून ते सूरच्या दिशेने निघाले. भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने ऑपरेशन कमळ केलं.

सोमवारी झालेल्या मतदानानंतर शिवसेनेचे आमदार गायब व्हायला सुरुवात झाली. गायब झालेले आमदार ठाण्यात जमले. ठाण्याहून ते सूरच्या दिशेने निघाले. भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने ऑपरेशन कमळ केलं. ऑपरेशन कमळसाठी विधान परिषद निवडणुकीचा मुहूर्त निवडला गेला. निवडणुकीच्या निमित्तानं सर्व आमदार एकत्र येण्याची प्रतीक्षा भाजपला होती. मतदान झाल्यानंतर सर्व आमदार एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी जमा झाले. तर संध्याकाळी शिंदे यांनी आमदारांना ठाण्याच्या महापौर बंगल्यावर आणलं होतं. महापौर बंगल्यावरच आमदारांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर फिरून येऊ म्हणून शिंदेंनी आमदारांना गाडीत बसवलं. त्याचवेळी काही आमदारांना शंका आली पण त्यांना निसटता आलं नाही. गाड्यांचा ताफा पालघरच्या पुढे गेल्यावर गुजरात पोलिसांचं संरक्षण मिळालं. गुजरात पोलिसांच्या संरक्षणातच आमदारांना सूरतमधील ली – मेरिडियन या हॉटेलमध्ये आणण्यात आलं.

Published on: Jun 21, 2022 03:44 PM
मुख्यमंत्रीपदावर कुणाला संधी द्यायची, हा पूर्णपणे सेनेचा प्रश्न : शरद पवार
एकनाथ शिंदेचं बंडात भाजपची कोणतीही पूर्वयोजना नाही- चंद्रकांत पाटील