सेलिब्रिटींच्या एकेका फोटोमागे मिळतो बक्कळ पैसा; कोण आहेत हे पापाराझी? ते नेमकं काय करतात?

| Updated on: Aug 09, 2024 | 10:53 AM

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत पापाराझी कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढलंय. हे पापाराझी कोण असतात, ते कसं काम करतात, सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करण्यासाठी त्यांच्यात एवढी स्पर्धा का आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडीओत मिळतील..

सेलिब्रिटींबद्दल छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. एक काळ असा होता, जेव्हा या सेलिब्रिटींचा एक फोटो मिळवण्यासाठी किंवा त्यांचे खास फोटोशूट पाहण्यासाठी सर्वसामान्य चाहत्यांना पैसे खर्च करावे लागायचे. प्रसिद्ध मॅगझिन, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्येच त्यांचे खास फोटो पहायला मिळायचे. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी मग फोटोग्राफर्सची डिमांड वाढत गेली. इंडस्ट्रीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच फ्रिलान्स फोटोग्राफर होते, जे सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करायचे आणि त्या फोटोंना खूप मागणी असायची. 2000 नंतर या गोष्टी बऱ्याच बदलत गेल्या. फोटोग्राफर्स सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटो क्लिक करू लागले. जसजसं हे विश्व डिजिटल होऊ लागलं, सोशल मीडियाचा वापर वाढू लागला.. तसं या फोटोग्राफर्सना वेगळं महत्त्व प्राप्त झालं. हेच फोटोग्राफर्स आता ‘पापाराझी’ म्हणून ओळखले जातात. हे पापाराझी कोण असतात, त्यांच्या कामाची पद्धत काय असते, सेलिब्रिटींच्या फोटोसाठी त्यांना किती आणि कसे पैसे मिळतात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये पापाराझी कल्चर कसं वाढत गेलं? याविषयी जाणून घेऊयात..

Published on: Aug 09, 2024 10:53 AM
Bangladesh Crisis : सत्ता बदलेल की बांगलादेश बदलेल? कट्टरपंथियांच्या नादात बांगलादेशात पुन्हा बर्बादी होणार?
शिंदेंसमोर अजितदादांचा मुख्यमंत्रि‍पदाबाबत गौप्यस्फोट, म्हणाले … तर संपूर्ण पक्षच फोडला असता