मुंब्र्यात हिजाबवरुन आंदोलन; आम्हाला संविधानाने अधिकार दिले आहेत
कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. हिजाब ही वैयक्तिक गोष्ट असल्यामुळे याबाबत कुणीही आमच्यावर कुणीही जबरदस्ती करु शकत नाही असे म्हणत मुंब्र्यातून मुस्लिम महिलांनी आंदोलन छेडले आहे.
कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. हिजाब ही वैयक्तिक गोष्ट असल्यामुळे याबाबत कुणीही आमच्यावर कुणीही जबरदस्ती करु शकत नाही असे म्हणत मुंब्र्यातून मुस्लिम महिलांनी आंदोलन छेडले आहे. यावेळी आंदोलनातील महिलांनी आम्हाला संविधानाने अधिकार दिले आहेत. त्यामुळे कर्नाटकात झालेल्या वादंगावरुन हे चुकीचं असल्याचे मत या महिलांनी व्यक्त केले. मुस्लिम महिलांनी काय पोषाख घालावा अथवा त्यांनी काय खावे यासाठी कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थांनी जोरजबरदस्ती करु नये असे म्हणत त्यांनी हिजाबवरुन वाद निर्माण करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनात महिला आणि मुलीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
Published on: Feb 13, 2022 08:31 PM