भाजप अन् शिवसेना UBT मध्ये बॅनरवॉर, महायुती आहे तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता; कुठं झळकले बॅनर?

| Updated on: Nov 08, 2024 | 1:57 PM

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षातील बड्या नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका कुठे सुरू आहे तर कुठे मोठाल्या बॅनरच्या माध्यमातून जनतेवर प्रभाव टाकण्यात येत असून मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षात जबरदस्त बॅनरवॉर रंगताना दिसतंय. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे शिवसेना UBT गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बॅनर मुंबईत झळकवण्यात आलेत. हे बॅनर सध्या मुंबईतील जनतेच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मुंबईच्या चौका-चौकात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मोठमोठे होर्डिंग्ज निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना लावण्यात आले आहे. या बॅनरच्या माध्यमातून केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची स्पर्धा महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू आहे. भाजपकडून महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे असा महायुतीच्या बॅनरवर उल्लेख केल्याचे पाहायला मिळतंय तर तर कोरोनाच्या काळात धारावी मॉडेलने ज्याने जगभर आपला मान वाढवला तो खरा नेता असा उल्लेख शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बॅनरवर कऱण्यात आलाय.

Published on: Nov 08, 2024 01:57 PM
सदा सरवणकरांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी, अमित ठाकरेंसोबत भाजप?
विधानसभेच्या निकालानंतर सत्तेची समीकरणे बदलणार?, नवाब मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याचं मोठं वक्तव्य