अमेरिकेच्या प्रवासाला जाणार बाप्पा, बाप्पाला परदेशी पाठवण्यासाठी कामगारांची लगबग

| Updated on: Jun 11, 2023 | 4:35 PM

VIDEO | रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामीण भागातून अमेरिकेच्या प्रवासाला निघाले बाप्पा

रत्नागिरी : गणेशोत्सव दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे कारागिरांची लगबग सध्या सुरू आहे त्यातच पर्यावरण पूरक गणपतीला मोठी मागणी होताना पाहायला मिळते आणि नुसती भारतातच नाही तर परदेशातही पर्यावरण गणपतीला मागणी होत असल्याचं सध्या चित्र निर्माण झाला आहे रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे सारख्या ग्रामीण भागातून अमेरिकेला गणपती निघालेत ही स्थिती म्हणजे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यासारखीच आहे. कारण प्रथमच ज्ञानेश कोटकर यांच्या हस्तकलेतून साकारल्या गेलेल्या. १०१  गणेश मूर्तींना अमेरिकेतून मागणी आले आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात या गणेश मूर्ती अमेरिकेला रवाना होतील याचा आनंद मूर्तिकार ज्ञानेश कोटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना पाहायला मिळत होता या गणेशमूर्ती घडवताना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले सध्या ते चार ते पाच लोकांचं पोट भरत आहेत आणि ग्रामीण भागातून अशा प्रकारे गणपती अमेरिकेला जाण्याची ही पहिलीच वेळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही…

Published on: Jun 11, 2023 04:35 PM
अमित शाह यांना बावनकुळे यांच निमंत्रण; राष्ट्रवादी नेत्याची खोचक टीका; म्हणाला, ‘म्हणजे हे नेते अकार्यक्षम’
मोठी बातमी! आगामी लोकसभा निवडणुकीबाबत ‘या’ नेत्याचा मोठा दावा, तर भाजपवर मोठा आरोप; काय म्हणाला,