…आणि त्यानं थेट पत्नीलाच कडेवर घेतलं, आनंद पोटात मावेना, पाहा VIDEO

| Updated on: Mar 20, 2023 | 8:49 PM

VIDEO | नादचखुळा ! पेन्शन बायकोला अन् आनंद मात्र नवऱ्याला, आंदोलनस्थळी एकच जल्लोष; आनंदाच्या भरात नवऱ्यानं....

पुणे : गेल्या सात दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होता. मात्र आता सात दिवसानंतर राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी संघटनांनी संपामधून माघार घेतली. राज्यातील अनेक भागातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. अशी स्थितीत राज्य शासनाबरोबर झालेल्या बैठकीत जुनी पेन्शन लागू होण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिलं आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांबद्दल निर्णय दिला अन् दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा करायसा सुरूवात केली. अशातच पुण्यातील खेड येथे हटके सेलिब्रेशन पाहायला मिळाले आहे. बायकोला पेन्शन मिळणार असल्याचा निर्णय समजताच आंदोलन स्थळीच त्यानं तिला उचलून घेत मोठा जल्लोष केला आहे. नवऱ्याला झालेल्या या आनंदाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Published on: Mar 20, 2023 08:49 PM
उद्धव ठाकरे यांच्या फ्रंट मॅनला अटक, मोहित कंबोज यांचं नेमकं ट्विट काय?
दिल्लीवरून निघालेली CRPF महिलांची बाईक रॅली भंडाऱ्यात