Special Report | पती-पत्नीत बोंबाबोंब…अख्ख्या गल्लीत आगडोंब!
पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे भांडण सुरू होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने घरातील गादी पेटवून दिली व स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला.
सातारा : पती पत्नीच्या भांडणातून एका दारुड्या माथेफिरु पतीने घराला आग लावून अकरा संसाराची राखरांगोळी केल्याची घटना पाटण तालुक्यातील माजलगाव गावात घडली आहे. आगीत स्वतःच्या घरासोबत अख्खा पाटील वाडा जळून खाक झाला असून वाड्यातील अकरा कुटुंबं रस्तावर आली आहेत. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे. नवरा बायकोतील भांडणाच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे भांडण सुरू होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने घरातील गादी पेटवून दिली व स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर या आगीने रुद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला आणि ही सर्व घरे जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रूपयाचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. जाळपोळ करणाऱ्या पतीला मात्र ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगला चोप दिला.