Ladki bahin Yojana Video : ‘लाडकी बहीण’च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारणाऱ्या पत्नीवर थेट कोयत्याने केला हल्ला अन्…

| Updated on: Mar 17, 2025 | 2:04 PM

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. याच दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे कुटुंबात कलह झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील लोणी गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीला मिळालेल्या लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर तिच्या पतीनेच डल्ला मारला आणि ते पैसे दारूसाठी खर्च केल्याने पती-पत्नीत टोकाचा वाद झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसै दारूवर का खर्च केले ? असा जाब विचारणाऱ्या पत्नीवर तिच्या दारूड्या पतीने आणि सासूने थेट कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारुवर परस्पर खर्च का केले? असा सवाल करत पत्नीने पतीला जाब विचारल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्याला त्याचा राग आला. त्याच रागातून त्या पतीने थेट कोयता काढला आणि आपल्या पत्नीवर हल्ला केला. पीडित महिलेने कुर्डूवाडी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेचा पती आणि सासू य दोघांविरोधातही ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Published on: Mar 17, 2025 02:04 PM
Satish Bhosale : खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
Sambhajinagar News : औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?