अजित पवारांकडून जाहीर कबुली; माझी चूक मी मान्य करतो, पण…

| Updated on: Sep 08, 2024 | 9:46 AM

गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा झाली. दादांचे मंत्री धर्मराव बाबाआत्राम यांची मुलगीच, भाग्यश्री आत्राम हलगेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. त्यावरुन आपण चूक केली तसंच करुन नका, असा सल्ला दिला.

कुटुंबात फूट पडू देऊ नका, माझी चूक झाल्याचं कबुल करतो असं अजित पवार जाहीरपणे बोललेत. मंत्री धर्मराव बाबा आत्रामांच्या कन्या, शरद पवारांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यावरुन दादांनी भाग्यश्री आत्रामांना बाबांसोबत राहण्याचासल्ला देत, स्वत:कडून चूक झाल्याचं म्हटलंय. घरात फूट पडू देऊ नका. मी माझी चूक मान्य करतो असं म्हणत. बंडामुळं पवार घराण्यात जी फूट पडली, त्यावरुन अजित पवारांनी जाहीर कबुली दिलीय. अजित पवारांनी आधी काका शरद पवारांच्याच विरोधात बंड केलं आणि 40 आमदारांसोबत महायुतीत सहभागी झाले. पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी पक्षही अजित पवारांना मिळाला. त्यातच लोकसभा निवडणुकीत बारामतीतून, बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांनाच उभं केलं. अजित पवारांच्या या भूमिकेमुळं पवार कुटुंबातही एकटे पडले. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनीही दादांना साथ न देता शरद पवारांच्या बाजूनं उभे राहिलेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रेत ते बोलत होते. त्यावेळी, म्हणाले काही जण घर फोडण्याचं काम करत असल्याचं आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

Published on: Sep 08, 2024 09:46 AM