Abdul Sattar | मी मदत करण्यास तयार, मुख्यमंत्री महोदय तुम्ही मदत करा : अब्दुल सत्तार
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. अब्दुल सत्तार यांनी काही मागण्या केल्या.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. अब्दुल सत्तार यांनी काही मागण्या केल्या. मराठवाडा सध्या मागास नाही, आमच्या सरकारमध्ये सर्वात निधी उपलब्ध केला. समृद्धी महामार्ग, नांदेड महामार्ग सुद्धा आम्ही मंजूर केला. आता अतिवृष्टी झाली त्याबाबत आपण काहीतरी घोषणा कराल, अशी मला अपेक्षा आहे. मी मदत करायला तयार आहे, मुख्यमंत्री महोदय आपणही मदत करा ही विनंती, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
Published on: Sep 17, 2021 02:35 PM