Virat Kohli | वन डे खेळण्यासाठी मी तयार आहे – विराट कोहली
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेत खेळणार की, नाही, यावरुन सुरु झालेल्या उलट-सुलट चर्चांना अखेर विराटनेच पूर्णविराम दिला आहे. “मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध आहे. एकदिवसीय मालिका खेळायला तयार आहे” असे खुद्द विराटनेच आज पत्रकार परिषदेत सांगितले.
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वनडे मालिकेत खेळणार की, नाही, यावरुन सुरु झालेल्या उलट-सुलट चर्चांना अखेर विराटनेच पूर्णविराम दिला आहे. “मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध आहे. एकदिवसीय मालिका खेळायला तयार आहे” असे खुद्द विराटनेच आज पत्रकार परिषदेत सांगितले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उद्या भारतीय संघ रवाना होणार आहे. त्याआधी कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. कसोटी मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीबद्दल विराट म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्हाला रोहितच्या अनुभवाची कमतरता जाणवेल” ‘रोहितचा अनुभव आणि कौशल्याची उणीव भासेल’ असे विराट म्हणाला.