Nagpur | मी माणसांत देव मानतो, भाजप नेत्यांनीही माणसांची सेवा करावी- Vijay Wadettiwar
भाजपने मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सुनावले आहे. मंदिरं बंद करण्याचा निर्णय आमचा नाही. हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. आम्ही फक्त केंद्राच्या सूचनांचं पालन करत आहोत, असं सांगतानाच भाजपने शुद्धीत येऊन बोलावं, बेधुंद वक्तव्य करू नयेत, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सुनावले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्राच्या पत्रानुसार मंदिरं उघडण्याचा प्रश्नच नाही. कारण संपूर्ण अधिकार केंद्राकडे आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला तर उद्याच आम्ही निर्णय घेऊ. केंद्राच्या आदेश आणि सूचनेप्रमाणे आम्ही काम करत आहोत. त्यांच्या सूचना केवळ महाराष्ट्रासाठी नाहीत तर देशासाठी आहे. आताच तुम्ही पाहिलं असेल केरळमध्ये मागच्या चार दिवसात एक लाखाच्यावर केसेस दाखल झाल्या. तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव संपलाय का? नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.