‘या सगळ्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या’, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

| Updated on: Apr 29, 2022 | 6:47 PM

महागाई समोर असल्यामुळे मला दुसरं काही सुचत नाही. पार्लमेंट मधल्या माझ्या प्रत्येक भाषणात मी महागाईचा मुद्दा उचलून धरलाय, आम्ही आंदोलनं केली, महागाईवर मात करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही एक पक्ष म्हणून, त्या ही आधी माणूस म्हणून करणार आहोत

मुंबई : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची ठाण्यात पत्रकार परिषद (Press Conference) पार पडली यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान महागाई आहे. महागाई समोर असल्यामुळे मला दुसरं काही सुचत नाही. पार्लमेंट मधल्या माझ्या प्रत्येक भाषणात (Speech) मी महागाईचा मुद्दा उचलून धरलाय, आम्ही आंदोलनं केली, महागाईवर मात करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही एक पक्ष म्हणून, त्या ही आधी माणूस म्हणून करणार आहोत असं खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्यात. हनुमान चालीसा, नवनीत राणा, रवी राणा या राजकीय घटनांबाबत प्रश्न विचारलं असता त्यावर उत्तर देताना, ‘निवडून आलेला खासदार म्हणून माझ्यावर असणाऱ्या राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या, महागाई सारख्या समस्या यामुळे मला या सगळ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाहीये’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

राज ठाकरेंच्या सभेला पुण्यातून जाणार 12 ते 15 हजार मनसैनिक
Delhi : NCB च्या कारवाईत सुमारे 350 कोटींचे 97 किलो ड्रग्ज जप्त