मी कधीही शिवसेना, मातोश्री आणि उद्धव ठाकरेंविरोधात बोललो नाही- सुजय विखे पाटील

| Updated on: Jun 12, 2022 | 6:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवणार असल्याचा घणाघात विखे पाटलांनी केलाय. अपक्षांना दोष देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे शिवसेनेने पहावं, असंही विखे पाटलांनी म्हटलंय.

अहमदनगर: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार (Shivsena Candidate) पराभूत झाल्यानंतर आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शिवसेनेला संपवणार असल्याचा घणाघात विखे पाटलांनी केलाय. अपक्षांना दोष देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे शिवसेनेने पहावं, असंही विखे पाटलांनी म्हटलंय. “माझ्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कधीही उद्धव ठाकरेंच्या, मातोश्रीच्या, शिवसेनेच्या आजी माजी कोणत्याच आमदाराच्या विरोधात बोललो नाही. मी आज जे काही आहे त्यातला 50 टक्के वाटा हा नगर जिल्ह्यातील (Ahemdanagar District) शिवसैनिकांचा आहे हे मी ठामपणे सांगू शकतो.राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातून शिवसेना संपवायचं काम करतंय, आजही माझं म्हणणं हेच आहे” असं वक्तव्य सुजय विखेंनी केलं आहे.

Video : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना क्लिनचीट, राजकीय पुनर्वसन होणार?
“शरद पवार राष्ट्रपती होत असतील तर…”, छगन भुजबळांनी व्यक्त केलं मत