“रिक्षाचालक होतो, बाळासाहेबांनी मला घडवलं”, संजय शिरसाट भावूक
"मी त्या काळात काहीच नव्हतो. आज जे काही आहे ते शिवसेनाप्रमुखांमुळे आहे. त्यांनी आम्हाला घडवलंय. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलंय."
“मी त्या काळात काहीच नव्हतो. आज जे काही आहे ते शिवसेनाप्रमुखांमुळे आहे. त्यांनी आम्हाला घडवलंय. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलंय. मी फक्त रिक्षाचालक होतो. यांच्याविरोधात कोणी काही बोललो तर आम्ही कोणाची पर्वा करणार नाही. त्यांच्याविषयीचा आदर नेहमीच मनात राहणार. हा 1986 सालमधला माझा शिवसेनाप्रमुखांसोबतचा हा फोटो आहे”, असं म्हणत असताना संजय शिरसाट भावूक झाले. यावेळी त्याने फोटोमागचा किस्सादेखील सांगितला.