Sharad Pawar : मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही, शरद पवार यांचं मोठं विधान

| Updated on: Aug 30, 2022 | 12:15 PM

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचं मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचं काय होणार, असंही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य महत्त्वूर्ण आहे. 

मुंबई : मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही, असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. राज्यातील सध्याच्या घडीच्या राजकीय घडामोडींच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचं मानलं जातं आहे. मी देखील 82व्या वर्षी पंतप्रधान (PM) होण्याचा कित्ता गिरवणार नाही, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का, याबाबतची चाचपणी सुरु असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यांचा राजकीय अर्थ काढला गेला नाही, तरच नवल! महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचं मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचं काय होणार, असंही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य महत्त्वूर्ण आहे. पाहा शरद पवार यांनी केलेलं नेमकं विधान काय होतं?

Published on: Aug 30, 2022 12:11 PM
Metro trial Run: मेट्रो 3 च्या ट्रायल रनसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल
Mumbai Metro Trial Run: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोला दाखविला हिरवा झेंडी