IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?
देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक असलेल्या 'IC 814 कंदाहार हायजॅक'वर नेटफ्लिक्सवर वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजवरून वाद सुरू असतानाच हायजॅकिंगची सत्यकथा काय होती, ते या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुयात..
IC 814 विमान हायजॅक हे आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठ्या घटनांपैकी एक आहे. पाच दहशतवाद्यांनी मिळून या इंडियन एअरलाइन्सच्या या विमानाचं अपहरण केलं होतं. त्यांनी भारत सरकारकडे तीन मोठ्या मागण्या केल्या होत्या. यात विमानातील एका प्रवाशाला आपला जीवसुद्धा गमवावा लागला होता. या घटनेनंतर तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारवरही बरीच टीका झाली होती. नेपाळच्या काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. याच घटनेवर आधारित ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ ही वेब सीरिज नुकतीच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजवरून मोठा वादही सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही हायजॅकिंग कशी झाली होती, दहशतवाद्यांनी कोणत्या मागण्या केल्या होत्या, विमानातील प्रवाशांची सुटका कशी झाली आणि त्यानंतर हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांचं काय झालं, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या..