T20 World Cup | टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन भारताबाहेर, 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप
क्रिकेट रसिक प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) यूएईमध्ये (UAE) खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : क्रिकेट रसिक प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी आयसीसी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) यूएईमध्ये (UAE) खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेची सुरुवात 17 ऑक्टोबर रोजी होईल तर स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल, अशी माहिती आहे. एएनआयने याबद्दल ट्विट केलं आहे. परंतु आयसीसीने याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नाही. आयसीसीच्या अधिकृत घोषणेची सगळेच क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा मोसम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय झाला आहे. काहीच दिवसांत उर्वरित स्पर्धेला सुरुवात देखील होणार आहे. आयपीएल पाठोपाठ टी ट्वेन्टी वर्ल्ड कप देखील सुरु होणार आहे. थोड्या दिवसांच्या अंतराने आयपीएलपाठोपाठ टी ट्वेन्टी स्पर्धा देखील सुरु होणार आहे.