Special Report | ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021 (ICC Women's Cricketer 2021) पुरस्कार जाहीर झाला आहे. या डावखुऱ्या फलंदाजासाठी 2021 हे वर्ष उत्कृष्ट ठरलं आहे. या वर्षात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खोऱ्याने धावा केल्या.
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021 (ICC Women’s Cricketer 2021) पुरस्कार जाहीर झाला आहे. या डावखुऱ्या फलंदाजासाठी 2021 हे वर्ष उत्कृष्ट ठरलं आहे. या वर्षात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. यासोबत महिला टी-20 लीग्समध्येदेखील तिने आपल्या बॅटची जादू दाखवली. वुमेन्स बिग बॅश लीग असो अथवा द हंड्रेड ही क्रिकेट लीग असो, स्मृती मानधनाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातला. याची दखल म्हणून तिचा ICC Women’s Cricketer 2021 पुस्काराने गौरव केला जाणार आहे.