बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जर कुणी जात असेल तर ते स्थळ अपवित्र कसं झालं? : Devendra Fadnavis

| Updated on: Aug 20, 2021 | 2:29 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जनआशीर्वाद यात्रेदरम्यान (Jan Ashirvad yatra) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Memorial) यांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जनआशीर्वाद यात्रेदरम्यान (Jan Ashirvad yatra) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Memorial) यांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी घणाघाती टीका केली. ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेले तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही शिवसैनिकांची कृती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

Ashok Chavan | नितीन गडकरींचं नेहरुंबद्दलच म्हणणं भाजप आणि संघानं लक्षात घ्यायला हवं : अशोक चव्हाण
Buldana | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू