Congress’s Chintan Shibir: काँग्रेस सत्तेत आल्यास ईव्हीएम बंद करणार, काँग्रेसच्या चिंतन शिबीरात मोठा निर्णय, सूत्रांची माहिती

| Updated on: May 15, 2022 | 5:21 PM

काँग्रेस सत्तेत आल्यास ईव्हीएम बंद करणार, असा मोठा निर्णय काँग्रेसच्या चिंतन शिबीरात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उदयपूर : काँग्रेस (Congress) पक्षाला उतरती कळा लागली आहे, असं आता बोललं जाऊ लागलंय. गेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं अवघ्या देशानं पाहिलं. यामुळे पुढे जाण्यासाठी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांसह अनेक प्रयोग व्हायला हवेत, अशी अनेक काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे. तसेच काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत (Congress President) निर्णय व्हायला हवा, असंही काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना वारंवार बोलून दाखवलंय. दरम्यान, उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबीर सुरू आहे. यावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi)भाजपवर हल्लाबोल केलाय. तर काँग्रेस सत्तेत आल्यास ईव्हीएम बंद करणार, असा मोठा निर्णय काँग्रेसच्या चिंतन शिबीरात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: May 15, 2022 05:21 PM
Thomas Cup 2022: 73 वर्षानंतर भारताने रचला इतिहास, बॅडमिंटमध्ये फायनल भारताने जिंकली
Nitesh Rane : म्यॅव म्यॅव केल तर मग चुकलं काय? आमदार नितेश राणेंचा टोला