Special Report | महाराष्ट्रात कोरोना वाढला तर लॉकडाऊन, मंत्र्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

| Updated on: Jan 01, 2022 | 9:09 PM

महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, सध्या लॉकडाऊनवरुन चर्चा रंगलीय. त्यात सरकारचे काही मंत्री थेटपणे लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. मुख्यमंत्री कोरोनावर लवकरच बोलणार असं म्हणतायत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवले जातील, असं स्पष्टपणे म्हटलंय.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, सध्या लॉकडाऊनवरुन चर्चा रंगलीय. त्यात सरकारचे काही मंत्री थेटपणे लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. मुख्यमंत्री कोरोनावर लवकरच बोलणार असं म्हणतायत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवले जातील, असं स्पष्टपणे म्हटलंय. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सध्या हेच विचारतोय की, लॉकडाऊन लागणार का ?

मंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत

मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कडक निर्बंधांवर बोट ठेवलंय. सध्या वाढती रुग्ण संख्या पाहता, महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचा सूर हा कडक निर्बंधांचा आहे. तर काही दिवसांत कोरोनावर बोलेण, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. आरोग्य मंत्र्यांनी मात्र सध्या सरकारच्या बैठकांमध्ये लॉकडाऊनची चर्चा नसल्याचं म्हटलंय.

कोरोना संसर्ग वाढत असल्यानं एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावरून हटवलं
Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा ताण पूर्णपणे कुणी कमी केला?