बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मी नसतो – संजय राऊत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना आज बाळासाहेब असते तर काय चित्रं असतं? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज बाळासाहेब असते तर तुम्ही म्हणता काय झालं असतं. आज बाळासाहेब असते तर बऱ्याच गोष्टी झाल्या नसत्या आणि नव्याने काही घडल्या असत्या.