Bhai Jagtap | गरज पडल्यास नितीन राऊतांचा राजीनामा मागू, भाई जगतापांचं मोठं विधान
महापारेषण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यावर निशाणा साधला आहे.
महापारेषण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यावर निशाणा साधला आहे. यावेळी जगताप म्हणाले की, लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मागू. असे म्हणत जगतापांनी नितीन राऊतांवर निशाणा साधला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्णय प्रशासनातील अधिकारी मानत नाहीत. त्यांचे आदेश पाळले जात नसतील आणि प्रशासन इतके उद्दाम असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असेल तर ते आम्ही तसे होऊ देणार नाही, असं आश्वासन जगताप यांनी यावेळी दिलं आहे. (If necessary, we will demand resignation of Nitin Raut, big statement from Bhai Jagtap)