लँडरकडून सकारात्मक संदेश आला तर…, चांद्रयान 3 मोहिमेबाबत भूशास्त्रज्ञ सुरेश चोपणे काय म्हणाले?

| Updated on: Aug 23, 2023 | 6:02 PM

VIDEO | चांद्रयान 3 मोहिमेबाबत भूशास्त्रज्ञ सुरेश चोपणे म्हणाले, 'लँडरकडून सकारात्मक संदेश आला तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल आणि विक्रम लँडरचे लँडिंग ठरलेल्या वेळेतच होणार असून, लँडरच्या सर्व यंत्रणा अपेक्षेप्रमाणे काम करतंय'

नागपूर, २३ ऑगस्ट २०२३ | चांद्रयान 3 चं लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आज उरणार आहे. त्यासाठी सगळी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परिस्थिती अनुकूल असेल तर चांद्रयान आजच उतरवलं जाणार आहे. त्यामुळे भारताच्या मून मिशनसाठीचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. चांद्रयान ३ मोहिमेतील आज सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरकडून सकारात्मक संदेश आला, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. यावेळी लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास ‘इस्रो’कडून व्यक्त केलाय. “चांद्रयान ३ च्या यशस्वी लॅंडिगचा विश्वास आहे, यामुळे जगभरात भारताची मान उंचावेल…यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोठी मेहनत घेतलीय. नासा आणि इसा चंद्रयान ३ मोहिमेत इस्रोला मदत करत आहेत. विक्रम लँडरचे लँडिंग ठरलेल्या वेळेतच होणार असून, लँडरच्या सर्व यंत्रणा अपेक्षेप्रमाणे काम करीत आहेत” असं शास्रज्ञ सुरेश चोपणे यांनी सांगितलं.

Published on: Aug 23, 2023 06:02 PM
चांद्रयान -3 मोहिमेसाठी विठुरायाच्या पंढरीत हरिनामाचा गजर, विठ्ठलाला काय घातलं साकडं?
चिमुकल्या फॅनच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले थेट या मनसैनिकाच्या घरी