प्रियांका गांधी यांना सन्मानाने सोडण्यात आले नाही तर काँग्रेस देशभर आंदोलन करणार – Nana Patole
प्रियांका गांधी यांना सन्मानाने सोडण्यात आले नाही तर काँग्रेस देशभर आंदोलन करणार, असा इशारा राज्यातील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी काल अटक केली. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी 36 तासांनी कारवाई केली. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं. दरम्यान, प्रियांका गांधी यांना सन्मानाने सोडण्यात आले नाही तर काँग्रेस देशभर आंदोलन करणार, असा इशारा राज्यातील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.