“संजय राऊत बाहेर असले तर या सरकारला अडचणी येतील म्हणून…”- संजय राऊत
मी कुठेही मला वाचवा म्हणून कुणासमोर गुडघे टेकणार नाही. संजय राऊत बाहेर असले तर या सरकारला अडचणी येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
मुंबई: गुडघे टेकणार नाही! असं वक्तव्य संजय राऊत यांनी आज बोलताना केलय. तपास यंत्रणांवर निशाणा साधताना त्यांनी असं म्हटलंय. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दोन वेळा ईडीने समन्स बजावलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) आणि भाजपवर जोरदार निशाना साधलाय. खोट्या केसेस टाकून अटक करायची असेल तर शिवसैनिक म्हणून सेनेसाठी अटकेला सामोरा जाणार. मी कुठेही मला वाचवा म्हणून कुणासमोर गुडघे टेकणार नाही. संजय राऊत बाहेर असले तर या सरकारला अडचणी येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.