एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं मोठं विधान
येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विविध संस्थेचे एक्झिट पोल समोर आलेत. यामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून महायुतीचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नुकतंच पार पडली. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विविध संस्थेचे एक्झिट पोल समोर आलेत. यामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून महायुतीचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. अशातच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आलं तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं. तर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, यावर शिवसेनेमध्ये एकमत झाल्याचं सांगत मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं वक्तव्य केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार याचा अंतिम निर्णय हे महायुतीचे नेतेच घेणार असल्याचेही शंभूराज देसाई यांनी म्हटलंय आहे. ‘शिवसेना पक्ष म्हणून म्हणा, व्यक्तिगत शंभूराज देसाई म्हणून म्हणाल तर आमचं कायमच सगळ्यांचं एकमत आहे की, शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आलं तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी असावेत, असे मत आहे. पण याचा अंतिम निर्णय हे महायुतीचे नेते घेतील’, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.