अजित पवार भाजपसोबत आले तर…, शिंदे यांच्या शिवसेनेचं काय होणार? बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 17, 2023 | 7:19 AM

VIDEO | अजित पवार भाजप सोबत आले तर शिंदे यांच्या शिवसेनेचं काय होणार? अजित पवार यांच्या संभाव्य चर्चांवरून शिंदे गटातच मतमतांतर

मुंबई : जर राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजप सोबत आले तर शिंदे यांच्या शिवसेनेचं काय होणार? अजित पवार यांच्या संभाव्य चर्चांवरून शिंदे गटातच मतमतांतर पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोपाचं काय होणार, निधी वाटपावरून भेदभाव केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला, यानंतर सत्तेतून बाहेर पडणारा शिंदे गट नेमकी काय भूमिका घेणार? शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आम्ही राष्ट्रवादीसोबतच सत्तेत बसणार नाही, तर तिथी निघणार फक्त गुण जुळायचे बाकी असल्याचे भाष्य गुलाबराव पाटील यांनी केलं. इतकंच नाही तर विजय शिवतरे यांनी अजित पवार यांना खुली ऑफर देत शिंदे गटात यावं असंच म्हटलंय. यावरून शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 17, 2023 07:19 AM
Special Report | राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार? शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फुटणार?
बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, १४ तासांनंतर ‘या’ गावात गारांचा खच, बघा व्हिडीओ