घटना बदलणार की नाही…, प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?

| Updated on: May 09, 2024 | 12:50 PM

जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या संविधानाचे पावित्र्य मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. असे असतानाही प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. घटना बदलणार म्हणजे आरक्षण जाणार असल्याचं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

भाजप ४०० जागा जिंकली तर संविधान बदलणार असा सातत्याने विरोधकांकडून आरोप केला जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितलं की, संविधान बदलणार हे तर्क नाही आणि सत्यही नाही. गेल्या पाच वर्षापासून आम्ही ४०० जागा घेऊन बसलो आहोत. जर असं पाप कुणाला करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. हा तर्क नाही, सत्यही नाही. पण हे का केलं जातंय, कारण त्यांच्याकडे त्यांचा इतिहास पाहा… जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या संविधानाचे पावित्र्य मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. असे असतानाही प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. घटना बदलणार म्हणजे आरक्षण जाणार असल्याचं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे आरक्षण जाणार नाही, हे सांगताय ते चुकीचं आहे. जर घटना बदलणार या चर्चा सुरू झाल्या नसत्या तर आरक्षणाची चर्चा झाली नसती. त्यामुळे सरळ उघडपणे सांगावं की घटना बदलणार आहेत की नाही? याचा खुलासा अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले तर चोराच्या मनात चांदणं… असं म्हणत त्यांनी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: May 09, 2024 12:50 PM
मला नाही वाटत…, काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याच्या पवाारंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
लिहून ठेवा… ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा तडीपार…, मविआच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ