आमची वायनरी असेल तर Kirit Somaiya यांनी ताब्यात घ्यावी : Sanjay Raut

| Updated on: Jan 30, 2022 | 1:57 PM

शिवसेना नेते संजय राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकासोबत पार्टनरशिप आहे, राऊतांच्या मुली त्याच्या संचालक आहेत असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावर आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी वाईन उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची एका बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप आहे, असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला होता. सोमय्यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शहांचा (amit shah) मुलगा ढोकळा विकतो का? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपवर आपली भूमिका मांडली. आमची एखादी वायनरी असेल तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यांनी चालवावी. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर तो काय गुन्हा आहे का? कुणीही असेल… कुणी व्यवसाय करत असेल… कुणी काम करत असेल… बँकांना लुबाडणं, चोऱ्यामाऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं, काम करणं, श्रम करणं कधीही चांगलं. भाजपचे थोतांडी लोकं काहीही म्हणत होते. मला कुणी तरी ते सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मला फोन होता, तेही हसत होते. आमच्या कुटुंबाच्या काही वायनऱ्या असतील तर सोमय्या यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं राऊत म्हणाले.

Published on: Jan 30, 2022 01:20 PM
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 30 January 2022
पालिका निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे, Aurangabad मध्ये इच्छुक उमेदवाराची बॅनरबाजी